Tarun Bharat

इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू कोहेन यांचे निधन

वृत्तसंस्था/ लंडन

इंग्लंडचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू तसेच 1966 साली फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱया इंग्लंड संघातील सदस्य जॉर्ज कोहेन यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले.

कोहेन यांनी आपल्या फुटबॉल कारकिर्दीत फुलहॅम फुटबॉल क्लबचे प्रतिनिधीत्व केले. ते 1966 साली फिफाची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱया इंग्लंड संघाचे उपकर्णधारही होते. या स्पर्धेतील विम्बलेच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने तत्कालिन पश्चिम जर्मनीचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव करत अजिंक्यपद मिळविले होते. कोहेन यांनी 37 सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले. कोहेन यांना त्यांच्या वयाच्या 29 व्या वर्षी फुटबॉलच्या मैदानावर खेळताना गुडघ्याला दुखापत झाली होती. इंग्लंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघामध्ये ते बचाव फळीत खेळत असत. इंग्लंडच्या फुटबॉल फेडरेशनतर्फे त्याचप्रमाणे अनेक आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंनी कोहेन यांना आदरांजली वाहिली.

Related Stories

भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर विजय

Patil_p

पश्चिम विभाग दुलीप करंडकाचा मानकरी

Patil_p

विराट परतताच मायभूमीत ‘विराट’ विजय!

Patil_p

मिझोरामचे क्रिकेट प्रशिक्षक लोधगर कालवश

Patil_p

‘डीएलएस’ पद्धतीचे जनक टोनी लुईस यांचे निधन

Patil_p

बार्बाडोस रॉयल्सचे नवे प्रमुख प्रशिक्षक पेनी

Patil_p