Tarun Bharat

माजी हॉकीपटू वरिंदर सिंग कालवश

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

1970 च्या दशकामध्ये भारतीय हॉकी संघाने विविध स्पर्धामध्ये ऐतिहासिक विजय मिळविले होते. तत्कालीन भारतीय हॉकी संघातील माजी ऑलिम्पिक  हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे मंगळवारी सकाळी वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. हॉकी इंडियातर्फे वरिंदर सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

1975 साली मलेशियात झालेल्या पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया भारतीय हॉकी संघामध्ये वरिंदर सिंग यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे 1972 च्या म्युनिच ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक तसेच 1973 च्या ऍमस्टरडॅम येथे झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱया भारतीय संघात वरिंदर सिंग यांनी प्रतिनिधीत्व केले होते. 1974 आणि 1978 च्या आशियाई क्रीडास्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱया भारतीय संघामध्ये वरिंदर सिंग यांचा समावेश होता. 1976 च्या माँट्रीयल ऑलिम्पिक स्पर्धेत वरिंदर सिंग यांचा भारतीय संघात समावेश होता. भारतीय हॉकी क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिल्याने वरिंदर सिंग यांचा 2007 मध्ये प्रतिष्ठेचा ध्यानचंद आजीवन पुरस्कार देवून गौरव करण्यात आला होता.

Related Stories

नव्या राष्ट्रीय विक्रमासह अचिंताने मिळविले रौप्य

Amit Kulkarni

भारतीय ऑलिंपिक संघटनेचे गांगुलीला निमंत्रण

Patil_p

जॉर्डन हेंडरसन वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू

Patil_p

आँलम्पिकसाठी पुन्हा आखाडय़ात उतरणार.

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी आजपासून

Omkar B

विश्व कसोटी मालिकेची फायनल लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!