Tarun Bharat

निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई :

निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले (madhav godbole) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.

डॉ. माधव गोडबोले हे निवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारी होते. प्रशासकीय कारकिर्दीसोबतच विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेखनासाठी ते ओळखले जात होते. त्यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून अर्थशास्त्र या विषयात एम.ए. व पीएच्?.डी. केली. 1959 साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला व मार्च 1993 मध्ये भारताच्या केंद्र सरकारचे गृहसचिव व न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. निवृत्तीनंतरही ते कायम सक्रिय हेते. विविध वृत्तपत्रातील स्तंभलेखनाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रशासकीय अनुभव जनसामान्यांसमोर मांडले. प्रशासकीय सेवेत दाखल होऊ इच्छिणाऱया तरुणांसाठी त्यांचे लेखन मार्गदर्शक ठरलं.

गोडबोले हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचेही अध्यक्ष होते. याशिवाय त्यांनी मनिला येथील आशियाई विकास बँकेत पाच वर्षे काम केले. केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्रालयाचे सचिव व नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहिलं होतं. गोडबोले यांच्या पश्चात पत्नी सुजाता, मुलगा राहुल, मुलगी मीरा असा परिवार आहे.

Related Stories

10 लाखांच्या बदल्यात उकळले 21 लाख; तरीही 20 लाखांसाठी तगादा

datta jadhav

एसटी कर्मचाऱ्यांनी 10 मार्चच्या आत कामावर यावे; अन्यथा…

datta jadhav

सातारा : हरिहरेश्वर बँकेत 37 कोटी 46 लाखांचा गैरव्यवहार, 29 जणांवर गुन्हा दाखल

Archana Banage

राणेंचा जुहूतील बंगला वादात; BMC ने बजावली नोटीस

datta jadhav

मराठी, हिंदी दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन

Tousif Mujawar

”मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही”; शरद पवारांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंच प्रत्युत्तर

Archana Banage