ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे आज सकाळी निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्या निधनाने क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.
दुर्राणी यांचा जन्म 11 डिसेंबर 1934 रोजी अफगाणिस्तानातील काबूलमध्ये झाला. 8 महिन्याचे असतानाच त्यांचे कुटुंबीय पाकिस्तानातील कराचीमध्ये स्थायिक झाले. दरम्यानच्या काळात भारताची फाळणी झाल्यानंतर ते भारतात आले. भारतातच ते लहानाचे मोठे झाले.
भारतीय संघातील एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व असा त्यांचा उल्लेख केला जातो. भारतीय संघासाठी त्यांनी एकूण 29 कसोटी सामने खेळले आणि त्यात 1202 धावा केल्या. या 1202 धावांमध्ये एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी 75 विकेट्सही घेतल्या आहेत. 1960 च्या दशकात दुर्राणी यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराने गौरविण्यात आलेले ते पहिले क्रिकेटपटू होते.
अधिक वाचा : एप्रिल ते जूनदरम्यान कडक उन्हाळा