नैरोबी / वृत्तसंस्था
केनियाचे माजी राष्ट्रपती मवाई किबाकी यांचे वयाच्या 90 व्या वषी निधन झाले. राष्ट्राध्यक्ष उहुरु केन्याट्टा यांनी शुक्रवारी किबाकी यांच्या मृत्यूची माहिती दिली. त्यांचे निधन हा देशासाठी एक दुःखाचा दिवस आहे. ते केनियाच्या राजकारणातील एक सज्जन, तेजस्वी आणि देशाच्या विकासाला चालना देणारे नेते म्हणून कायमचे स्मरणात राहतील, असे केन्याट्टा म्हणाले. किबाकी यांनी 2002 ते 2013 या कार्यकाळात दोन टर्ममध्ये राष्ट्रपतीपद सांभाळले होते.