Tarun Bharat

‘भारत जोडो यात्रेत’ राहुल गांधींना आदित्य ठाकरेंची साथ; ठाकरे गटाच्या नेत्याची माहिती

ऑनलाईन टीम/तरुण भारत

कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. महारष्ट्रातील नांदेड (Nanded) जिल्हातील देगलूर येथून भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) आज संध्याकाळपासून सुरूवात होणार आहे. या यात्रेत महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेतीलही काही नेते या पदयात्रेत सहभागी होणार असल्याचं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात होतं. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत माजी मंत्री आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार आहेत, अशी माहिती ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली आहे. (Former minister Aditya Thackeray will participate in Congress leader Rahul Gandhi Bharat Jodo Yatra)

दरम्यान, आज महाराष्ट्रात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रवेश होणार आहे, या यात्रेचे काँग्रेससह विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून स्वागत जाणार असून, रात्री 9 वाजता पदयात्रा प्रारंभ होऊन वन्नाळीकडे प्रयाण करणार आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत माजी मंत्री आणि ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार आहेत.

९ नोव्हेंबरला नांदेड येथे आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटातील काही खासदार आणि आमदार देखील या यात्रेत सहभाग घेणार आहेत. याबाबत महाविकास आघाडीने तयारीही सुरु केली असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे आमदार सचिन अहिर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे. परंतु आमचे नेते आदित्य ठाकरे हे कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. असं ते म्हणाले. आदित्य ठाकरे सध्या मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर असून तिथूनच ते थेट नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

Related Stories

सातारा जिल्ह्यातील सलून्स,पार्लर सशर्त सुरु

Archana Banage

नागठाणे येथे कोव्हिड केअर सेंटर सुरू

Archana Banage

‘इन्फोसिस’ सीईओंना अर्थ मंत्रालयाचे समन्स

Patil_p

“…तर लष्करी भागाचं वीज-पाणी बंद करू”, तेलंगणा मंत्र्यांचा इशारा

Archana Banage

पूरग्रस्तांना २०१९ च्या निकषानुसार मदत

Archana Banage

पहिल्या दिवशी १५-१८ वर्षांच्या ४१ लाख टीनएजर्सना लस

Abhijeet Khandekar