Former MLA krishna hegde Joins Eknath Shinde faction : माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राम राम ठोकत त्यांच्या समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. काल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यानंतर शिंदे गटात प्रवेश केला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हेगडे यांनी ठाकरे यांची साथ सोडल्याने उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी बाळसाहेबांची शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी त्यांची नियुक्ती केली.कृष्णा हेगडे यांचा काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि आता बाळासाहेंबाची शिवसेना राजकीय प्रवास राहिलेला आहे. कृष्णा हेगडे यांचा विले पार्ले हा गड मानला जातो.भाजपमधून बाहेर पडत त्यांनी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी शिवबंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.


previous post