प्रतिनिधी / बेळगाव
मूळचे बेळगावचे व कोल्हापूर शिक्षक मतदारसंघात तब्बल दोन वेळा निवडून आलेले माजी आमदार सुरेश विठ्ठलराव पाटील (वय 83) यांचे गुड्सशेड रोडवरील निवासस्थानी रविवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे व पाच भाऊ असा परिवार आहे.
पाटील गल्ली, चव्हाण-पाटील परिवारातील ते ज्ये÷ होते. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे ते आजीव सभासद होते. सोमवार दि. 17 रोजी दुपारी 12 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.