Tarun Bharat

माजी खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी करणार भाजपप्रवेश

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

तेलंगणा काँग्रेसला रामराम ठोकलेले माजी खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर आमच्या मोठा आकांक्षा होत्या. परंतु राज्यात या आकांक्षांची पूर्तता अद्याप होऊ शकलेली नसल्याचे विधान त्यांनी केले आहे. भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत रेड्डी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी खासदार रेड्डी यांनी मागील वर्षी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.

तेलंगणा भाजपचे प्रभारी तरुण चुग यांनी भाजप प्रदेशाध्यक्षासोबत रेड्डी यांची भेट घेत त्यांना पक्षात सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते. विश्वेश्वर रेड्डी हे अपोलो रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालिका संगीता रेड्डी यांचे पती आहेत. विश्वेश्वर रेड्डी हे काँग्रेसमध्ये सामील होण्यापूर्वी तेलंगणा राष्ट्र समितीत सक्रीय होते. रेड्डी यांनी 2014 च्या निवडणुकीत टीआरएसच्या वतीने चेवेल्ला लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला होता. 2019 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी टीआरएसला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

Related Stories

लोंगेवाला युद्धाचे हिरो कर्नल धर्मवीर कालवश

Patil_p

ओबीसी सूची अधिकार विधेयक लोकसभेत सादर

Patil_p

भाजप ओलांडणार बहुमताचा आकडा

Patil_p

राष्ट्रपतींना भेटण्यापूर्वी सर्वपक्षीय प्रतिनिधी संभाजीराजेंच्या निवासस्थानी

Archana Banage

नितीश कुमार फक्त सत्तेत राहून आपलं आयुष्य घालवताहेत- तेजस्वी यादव

Archana Banage

आरबीआयशी चर्चेअंतीच नोटाबंदीचा निर्णय

Amit Kulkarni
error: Content is protected !!