ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Former RBI Governor Raghuram Rajan participates in ‘Bharat Jodo’ Yatra RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाले आहेत. भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये पोहचली आहे. राजस्थानातील सवाई माधोपुर येथील भदौतीमध्ये रघुराम राजन या यात्रेत सामील झाले. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन रघुराम राजन यांचा राहुल गांधींसोबतचा ‘भारत जोडो’ यात्रेतील फोटो ट्विट करण्यात आला आहे. द्वेषाच्या विरोधात देशाला एकत्र आणण्यासाठी लोकांची संख्या वाढत आहे. ही वाढती संख्या आपण यशस्वी होऊ हे दर्शवत आहे, असं कॅप्शनही या फोटोला देण्यात आलं आहे.