मडगांव : क्रीडा खात्याचे संचालक तथा भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे माजी कार्यकारी संचालक रॉक डायस यांचे काल निधन झाले. 1975 ते 1982 या कालावधीत बॅडमिंटन खेळातील राष्ट्रीय पातळीवर रॉक डायसने गोव्याचे प्रतिनिधीत्व केले होते. गांधीनगर गुजरात येथे सुद्धा त्यांनी पश्चिम क्षेत्रिय भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. सांताक्रूझ येथील रहिवासी असलेले डायस यांनी 2010 मध्ये दिल्लीत झालेल्या राष्टकुल क्रीडा स्पर्धेत उपमहासंचालकपदही काम कले होते. सांताक्रूझ येथील न्य इंग्लीश हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर धेंपे कॉलेजमधून त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या निधनामुळे राज्यातील क्रीडा क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. साईद्वारे देशात पायाभूत सुविधांचा विकास, सिंथेटिक पृष्ठभाग तयार करणे, उपकरणे आयात करणे आणि भारतीय संघ तयार करणे यासारख्या क्रीडा विकासत डायस यांनी मोठे योगदान दिले. दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनातही त्यांचे योगदान मोलाचे होते. 1986 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय युवा पुरस्कारही प्राप्त झाला होता.
Previous Articleस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत आज होणार सुनावणी
Next Article छ. संभाजीनगरमध्ये ‘बीआरएस’ची 14 एप्रिलला सभा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.