Tarun Bharat

माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांचे निधन

शिमला / वृत्तसंस्था

माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री आणि काँग्रेस नेते पंडित सुखराम यांनी बुधवारी वयाच्या 94 व्या वर्षी दिल्ली एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी 11 वाजता हिमाचल प्रदेशमधील मंडी शहरातील हनुमानघाट येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पंडित सुखराम यांना ब्रेनस्ट्रोकच्या उपचारासाठी हिमाचलहून दिल्लीत आणण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. बुधवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले, असे सुखराम यांचा मुलगा अनिल शर्मा यांनी सांगितले.

सुखराम हे 1993 ते 1996 याकाळात केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) होते. ते मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदारही होते. त्यांनी पाचवेळा विधानसभा आणि तीनवेळा लोकसभा निवडणूक जिंकली होती. सुखराम यांना ‘संवाद’क्रांतीचे जनक मानले जाते. तसेच हिमाचल प्रदेशच्या राजकारणातील चाणक्मय अशीही त्यांची ओळख होती. सुखराम यांना 2011 मध्ये पाच वर्षांची शिक्षा झाली होती. 1996 मध्ये दूरसंचारमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.

सोमवारी हृदयविकाराचा झटका

पंडित सुखराम यांना सोमवार दि. 9 मे रोजी सकाळी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर दिल्लीत हलविले. मात्र, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास सोनिया गांधी यांनी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि पंडित सुखराम यांचे मोठे नातू आश्रय शर्मा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, मंगळवारी पंडित सुखराम यांच्या निधनाच्या खोटय़ा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत होत्या. सोशल मीडियावरील या वृत्तांचेही कुटुंबीयांनी खंडन केले होते. त्यानंतर दुसऱयाच दिवशी म्हणजे बुधवारी पहाटे त्यांच्या मृत्यूची बातमी आली.

Related Stories

स्मृती इराणींवरील आरोपप्रश्नी काँग्रेस नेत्यांना समन्स

Patil_p

Bilkis Bano Case : पॅरोलवर असताना आरोपीकडून महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

Archana Banage

पंजाब सरकारने वाढवला 2 आठवडे लॉकडाऊन

datta jadhav

दिल्ली : सोनिया गांधी यांची प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांचे कोरोनाने निधन

Tousif Mujawar

कोविड सेंटरमधील आगीत आंध्रात 10 रुग्णांचा मृत्यू

Patil_p

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीचा घोळ कायम

Patil_p