तरुण भारत

माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचे निधन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित सुखराम शर्मा यांचं निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. (Former Union Minister Pandit Sukhram Sharma passes away)

Advertisements

सुखराम यांना 4 मे रोजी ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यांच्यावर हिमाचल प्रदेशातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी प्रकृती खालावल्याने त्यांना हेलिकॉप्टरने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हापासून ते व्हेंटिलेटरवर होते. उपचारादम्यान मंगळवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या (दि.12) सकाळी 11 वाजता पंडित सुखराम यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मंडी शहरातील ऐतिहासिक सेरी व्यासपीठावर ठेवण्यात येणार असून, त्यानंतर हनुमानघाट येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुखराम शर्मा 1993-1996 मध्ये केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) होते. ते मंडी (हिमाचल प्रदेश) येथून लोकसभेचे खासदार होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत सुखराम यांनी पाच वेळा विधानसभा आणि तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली होती.

Related Stories

राम मंदिराबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मुक्त पत्रकार अटकेत

datta jadhav

अर्थमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

Patil_p

दिल्लीतील हिंसाचारात आप-काँग्रेसचा हात

Patil_p

हेरॉइनचा ट्रान्झिट पॉइंट ठरला भारत

Patil_p

भूपेंद्र पटेल गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी घेणार शपथ

Abhijeet Shinde

ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!