Tarun Bharat

माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्या भगिनी डॉ. मधु पाटील यांचे निधन

Advertisements

सांगली प्रतिनिधी

माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या भगिनी मधु प्रकाश पाटील (वय ४४) यांचे  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर  शनिवारी दुपारी एक वाजता पद्माळे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. काँग्रेसचे खासदार स्व. प्रकाशबापू पाटील आणि काँग्रेसच्या नेत्या श्रीमती शैलजा पाटील यांच्या त्या कन्या होत्या. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास पुणे येथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची त्या नात होत्या. घरातील पहिली मुलगी म्हणून दादांचा त्यांच्यावर जीव होता. त्यांना प्रेमाने चिमुताई म्हणून ओळखले जात होते. लहानपणी त्यांच्यावर इंग्लंडमध्ये दोन वेळा हृदय शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर आणखी एकदा त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तरीही त्यांनी जिद्दीने वैद्यकीय शिक्षण घेतले आणि जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून दिले.

सांगलीत नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी सामान्य जनतेसाठी झटून काम केले होते. शिवाय बोगस डॉक्टर विरोधात त्यांनी सुरू केलेली मोहीमही चांगलीच गाजली होती. सध्या त्या पुणे येथे आरोग्य उपसंचालक कार्यालयात सेवेत होत्या. कोरोना काळातही त्यांनी मोठ्या हिमतीने रुग्णांना सेवा देऊन कोरोनावर मात करण्यात मदत केली होती. आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी अनेक रुग्णांना उपचाराबरोबरच दिलासा देऊन बरे केले होते.

Related Stories

सांगली : लसीची प्रतीक्षा संपली; ६६ हजार डोस उपलब्ध

Abhijeet Shinde

मिरजेत २०० जणांच्या अँटीजन चाचणीत दोघे कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

माझी एसटी माझी जबाबदारी : सुहास जाधव

Abhijeet Shinde

सांगली : पालकमंत्री पाटील यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा

Abhijeet Shinde

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वन्यजीवांनी समृद्ध, ३०८ वन्यजीवांचा अधिवास

Rahul Gadkar

पलूसच्या पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न विधीमंडळात मांडणार : प्रविण दरेकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!