Tarun Bharat

विंडीजचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड मरे कालवश

वृत्तसंस्था/ सेंट जोन्स

विंडीज संघाचे माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज डेव्हिड मरे यांचे शुक्रवारी रात्री उशिरा वयाच्या 72 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाल्याची माहिती क्रिकेट विंडीजतर्फे देण्यात आली.

डेव्हिड मरे हे विंडीज संघाचे तसेच बार्बाडोस संघाचे यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून कार्यरत होते. डेव्हिड मरे हे विंडीजचे माजी महान क्रिकेटपटू एव्हर्टन विक्स यांचे चिरंजीव आहेत. तर डेव्हिड मरे यांचा चिरंजीव रिकी होयटे हे सध्या बार्बाडोस आणि विंडीज अ संघामध्ये यष्टीरक्षक आणि फलंदाज आहेत. 1973 साली डेव्हिड मरे यांचा इंग्लंड दौऱयासाठी विंडीज संघात समावेश करण्यात आला होता. तर त्यांनी आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण दुसऱया वनडे सामन्यातून केले होते. विंडीजच्या तत्कालिन संघामध्ये लान्स गिब्ज, पेड्रिक्स, रोहन कन्हॉय, क्लाईव्ह लॉईड यांचा समावेश होता. डेव्हिड मरे यांनी कसोटी पदार्पण 1978 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात केले होते. मरे यांनी आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 19 कसोटी, 10 वनडे आणि 114 प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. 19 कसोटीत त्यांनी 21.46 धावांच्या सरासरीने 601 धावा जमवताना 3 अर्धशतकांची नेंद केली. तसेच त्यांनी कसोटीत यष्टीमागे 57 झेल आणि पाच यष्टिचितची नोंद केली आहे. 10 वनडे सामन्यात मरे यांनी 45 धावा जमवल्या आहेत. एकूण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी एकूण 4503 धावा जमवल्या असून त्यामध्ये 7 शतके आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 206 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या असून त्यांनी यष्टीमागे 293 झेल आणि 30 यष्टीचित केले आहेत.

Related Stories

बॅडमिंटनपटू मिथुन मंजुनाथ अंतिम फेरीत

Patil_p

सेहवाग म्हणतो चार दिन की चाँदनी होती है, टेस्ट क्रिकेट नही!

Patil_p

किदाम्बी श्रीकांत, मालविका दुसऱया फेरीत

Patil_p

बंगालच्या विजयात विवेक सिंगचे शतक

Patil_p

2021 ची टोकियो मॅरेथॉन लांबणीवर?

Patil_p

अपयशाच्या गर्तेतील भारतासमोर आज अफगाणचे आव्हान

Patil_p