Tarun Bharat

एसकेई सोसायटीचा आज स्थापना दिन

Advertisements

राजमाता राणी पार्वती देवींचे नातू खेमराज सावंत-भोसले यांची उपस्थिती

प्रतिनिधी /बेळगाव

एसकेई सोसायटीचा स्थापना दिन शनिवार दि. 6 रोजी सकाळी 10.30 वाजता आरपीडी कॉलेजच्या के. एम. गिरी सभागृहात होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डी. टी. शिर्के उपस्थित राहणार आहेत. निमंत्रित म्हणून राजमाता राणी पार्वती देवी यांचे नातू खेमराज सावंत-भोसले उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एसकेईचे चेअरमन किरण ठाकुर असणार आहेत.

प्रा. डी. टी. शिर्के हे एमएससी पदवीधर असून बीएससी व एमएससीमध्ये गुणवत्ता श्रेणीसह त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. युजीसी परीक्षा दिल्यानंतर युजीसी-सीएसआयआर रिसर्च फेलो म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या स्टॅटिटीक्स विभागात रुजू झाले. 1990 मध्ये प्राध्यापक तर 2005 मध्ये विभाग प्रमुख म्हणून काम सुरू केले.

शैक्षणिक क्षेत्रात त्यांना 30 वर्षाचा अनुभव असून संशोधनामध्ये 33 वर्षे ते कार्यरत आहेत. इंटरनॅशनल स्टॅटीस्टिकल असोसिएशन, नेदरलॅन्डचे ते सदस्य आहेत. त्यांना शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट पी. जी. टिचर, अकॅडमी ऑफ इंडियन सायन्सेसचे समर रिसर्च फेलो, अकॅडमी एक्सलन्समध्ये जवाहरलाल नेहरु मेमोरियल फंड ऍवॉर्ड तर सीएसआयआरतर्फे ज्युनिअर ऍण्ड सिनिअर रिसर्च फेलोशीप असे गौरव प्राप्त झाले आहेत.

Related Stories

एफआरपी अधिक दोनशे रुपये दर दिलाच पाहिजे!

Patil_p

थंडी वाढली… पारा 13 अंशावर

Patil_p

कॅन्टोन्मेंटचे वीजबिल भरण्यासाठी निधी मंजूर करा

Amit Kulkarni

न्यायप्रविष्टगाळे वगळून उर्वरितांसाठी बोली

Amit Kulkarni

सामाजिक अंतर-मास्क सक्तीसाठी उदासीनता का?

Amit Kulkarni

लोखंडी कमान कशासाठी?

Patil_p
error: Content is protected !!