Tarun Bharat

तेरेखोल येथे हुतात्मा स्मारकाच्या नूतनीकरणाची पायाभरणी

Advertisements

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार  : हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर यांच्या स्मारकचे काम मार्गी,जीवनदायिनीच्या प्रयत्नांना अखेर यश 11 लाख 65 हजार रुपये खर्चून उभारण्यात येईल तेरेखोल किल्ल्यावर स्मारक 

मोरजी /प्रतिनिधी

गोवा मुक्ती लढय़ात सहभागी होण्यासाठी आलेल्या आणि तेरेखोल किल्ल्यानजीक शहीद झालेल्या पनवेल – मुंबई येथील हिरवे गुरुजी आणि  अलिबाग – रायगड येथील शेषनाथ यांच्या तेरेखोल किल्ल्यावरील हुतात्मा स्मारक नूतनीकरणाचा आदेश ( वर्क ऑर्डर)  गोव्याच्या राज्यपालांच्या वतीने  सार्वजनिक बांधकाम विभाग – 5 तर्फे जारी करण्यात आलाआहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज 21 जून रोजी सकाळी 11.00 वाजता तेरेखोल येथील हुतात्मा श्री हिरवे गुरुजी आणि श्री शेषनाथ वाडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हुतात्मा स्मारकाच्या नूतनीकरण आणि सुधारणा कामासाठी उपस्थित राहून पायाभरणी करणार आहेत.

एकूण  11,65134ा.51 पैसे खर्चून या ठिकाणी हुतात्मा स्मारक उभारण्यात येणार आहे.त्यासाठी 150 दिवसांचा  कालावधी  खोर्ली म्हापसा येथिल ठेकेदार  नंदकुमार इंडस्ट्रिज यांना देण्यात आला आहे. या ठिकाणी दोन्ही हुतात्म्या?ची स्मारके व्हावीत यासाठी पेडण्यातील जीवनदायींनी  संस्था प्रयत्नशील होती.त्यासाठी त्यांनी पनवेल येथील हिरवे गुरुजी प्रति÷ान आणि अलिबाग रायगड येथे राहत असलेल्या शेषनाथ वाडेकर यांच्या कुटुंबीयास भेटी दिल्या होत्या.तसेच या दोन्ही शहीद कटुंबियांना एकत्रित आणून माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या हस्ते सत्कारही घडवून आणला होता.

त्यानंतर अलीकडेच नवनिर्वाचित आमदार जित आरोलकर यांना जीवनदयिनी तर्फे निवेदन सादर करून स्मारकाचे काम मार्गी लावण्याची मागणीही केली त्याची दखल घेऊन आमदार जित आरोलकर यांनी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याशी बोलणी केली तिने. त्याला अनुसरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अखेर या हुतात्मा स्मारकाच्या कामाचा आदेश जारी केला. दरम्यान  जीवनदायींनी पेडणे चे अध्यक्ष नारायण सोपटे केरकर, हिरवे गुरुजी प्रति÷ानचे अध्यक्ष  श्री प्रदीप  हिरवे ,शेषनाथ वाडेकर यांचे पुत्र जयंत शेषनाथ वाडेकर यांनी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, मंदेचे आमदार जित आरोलकर यांचे आभार मानले आहेत.

Related Stories

मातृशक्तीचा सन्मान हा संस्कृतीचा आदेश

Patil_p

मडगाव पालिकेची आज खास बैठक

Amit Kulkarni

आमदार अपात्रता प्रकरणी सभापतींकडून उद्या सुनावणी

Patil_p

विहिरीत पडलेल्या म्हशीला जीवनदान

Amit Kulkarni

कुर्टी-फोंडा येथे जलवाहिनी फुटली

Patil_p

वसाहतवादी शिक्षण रोखण्यासाठी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!