Tarun Bharat

सारमानस येथे हनुमान मंदिराच्या सभागृहाची पायाभरणी

जिल्हा पंचायत निधीतून होणार सभागृह व व्यासपीठ : आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

डिचोली/प्रतिनिधी

पिळगाव पंचायत क्षेत्रातील सारमानस येथे असलेल्या श्री हनुमान मंदिरासाठी जिल्हा पंचायत निधीतून साकारण्यात येणाऱया सभागृह व व्यासपीठाच्या कामाची पायाभरणी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते करण्यात आली. जिल्हा पंचायत निधीतून सुमारे 8 लाख रू. खर्चून सदर सभागृह व व्यासपीठ साकारण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत यांनी दिली.

  या सोहळय़ास आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, मयेचे जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, पिळगावचे पंचसदस्य प्रदीप नाईक, ललना गिमोणकर, निलेश जल्मी, श्री हनुमान देवस्थान समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सावंत, खजिनदार महेश वळवईकर, माजी जिल्हा पंचायत सदस्या अंकीता नावेलकर, भाजप मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर, तन्वी सावंत, जोत्स्ना चुंबलकर, राजेंद्र राणे, ज्ञानेश्वर जल्मी व इतरांची उपस्थिती होती.

  मये मतदारसंघाच्या विकास प्रक्रियेला वेग देण्यासाठी आपण निवडून आल्यानंतर लगेच कामाला लागलो आहे. मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य तथा पंचायतींच्या पंचसदस्यांनीही आपापल्या विभागाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहतना कामांना वेग द्यावा. विकास प्रक्रियेत आपले सदैव सकारात्मक सहकार्य सर्वांना असणार. लोकोपयोगी कामांसाठी आपण आपले योगदान देताना आपापल्या परिसराची जबाबदारी घेतल्यास संपूर्ण मतदारसंघ विकसनशील व्हायला वेळ लागणार नाही, असे यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी आपल्या भाषणात म्हटले.

आपण निवडून आल्यानंतर या मतदारसंघातील प्रत्येक पंचायतीमध्ये आवश्यकतेनुसार कामे हाती घेतली आहे. या कामांना सरकारचे योग्य सहकार्य लाभत असल्याने आज ही कामे प्रत्यक्षात उतरत आहेत, असे जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत यांनी सांगितले. 

या सभागृह व व्यासपीठाच्या कामाबद्दल देवस्थान समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सावंत यांनी आमदार व जिल्हा पंचायत सदस्य यांचे आभार मानताना या भागात विकासासाठी सदैव लक्ष घालण्याची मगणी केली. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या सभागृहाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित इतर मान्यवरांचीही भाषणे झाली. तर देवस्थान समितीचे खजिनदार महेश वळवईकर यांनी आभार मानताना सारमानस भागात विकासाच्या दृष्टीने आमदार व जिल्हा पंचायत सदस्यांनी लक्ष घालून येथे असलेल्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली.

माजी जिल्हा पंचात्रत सदस्य तथा उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा अंकीता नावेलकर यांच्या पुढाकाराने जि. पं. निधीतून सारमानस फेरीधक्क्यावर सुशोभीकरण व बसण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. तर जि. पंचायत निधीतून या भागात आणखीन एक प्रकल्प साकारण्यात येणार असल्याने लोकांनी समाधान व्यक्त केले.

Related Stories

म्हापशात फेरी बंद ठेवून विक्रेत्यांकडून निषेध

Patil_p

बसवेश्वर मंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी

Amit Kulkarni

तीन मच्छीमारी बोटी बुडाल्या

Amit Kulkarni

डॉ. गुरुदास नाटेकर यांचा लायन्स क्लबर्फे सत्कार

Amit Kulkarni

खनिज मालाच्या लिलावाला अल्प प्रतिसाद

Omkar B

सभापती पाटणेकर यांचा निवडणूक लढविण्यास नकार

Amit Kulkarni