अबकारी विभागाची कारवाई : बागलकोट जिल्हय़ातील दोघांना अटक
प्रतिनिधी / बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुतगट्टी क्रॉसजवळ साडेचार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी अबकारी विभागाच्या अधिकाऱयांनी ही कारवाई केली असून याप्रकरणी बागलकोट जिल्हय़ातील दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
राजेसाब दस्तगीरसाब हणगंडी (वय 42, रा. बनहट्टी), हुसेनसाब हणगंडी (वय 30, रा. महालिंगपूर, ता. मुधोळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. अबकारी निरीक्षक लिंगराज के. व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
गुड्स वाहनातून राजेसाब व हुसेनसाब हे दोघे बेळगावकडे येत होते. सुतगट्टी क्रॉसजवळ अबकारी अधिकाऱयांनी हे वाहन अडवून तपासणी केली असता 4 किलो 563 ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त गांजा व वाहनाची किंमत साडेतीन लाख रुपयांइतकी होते.
अबकारी विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, उपायुक्त जयरामेगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक चनगौडा पाटील, निरीक्षक लिंगराज के., उपनिरीक्षक एस. एच. शिंगाडी, प्रवीण हुली, सुरेश हळबण्णावर आदींनी ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.