Tarun Bharat

पूर्व भागात लम्पिस्कीनमुळे एका दिवसात चार जनावरांचा मृत्यू

Advertisements

मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या आता पोहोचली 26 वर

वार्ताहर /सांबरा

तालुक्याच्या पूर्व भागांमध्ये लम्पिस्कीन आजाराने एका दिवसामध्ये एका गाईसह चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. पूर्वभागामध्ये लम्पिस्कीन आजाराने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या आता 26 वर पोहोचली आहे.

शुक्रवारी बसवण कुडची येथील शेतकरी सचिन खोकलेकर यांच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी यांच्याच एका बैलाचा मृत्यू झाला होता. बसरीकट्टी येथील शेतकरी निंगाप्पा कोंडसकोप व चंद्रकांत सांबरेकर त्यांच्या बैलांचाही लम्पिस्कीमुळे मृत्यू झाला आहे. मुतगा येथील शेतकरी वसंत पाटील यांच्या गाईचाही मृत्यू झाला आहे .

दिवसेंदिवस लम्पिस्कीनचा फैलाव वाढत चालला असून, शेतकऱयांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. लम्पिस्कीनने तर शेतकऱयांचे कंबरडेच मोडले आहे. परंतु अशा परिस्थितीत शेतकऱयांना आर्थिक पाठबळ देण्याऐवजी शासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

Related Stories

गुरुनानक जयंतीनिमित्त अनाथाश्रमात भोजन वाटप

Amit Kulkarni

विवाहाचा वाढदिवस कोरोना योद्धय़ांसमवेत

Patil_p

पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी मनपा सज्ज

Amit Kulkarni

कर्नाटक बिटकॉइन घोटाळा: भाजपने नेतृत्व बदलाची शक्यता फेटाळली

Abhijeet Khandekar

‘त्या’ साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे समस्या

Amit Kulkarni

सीमाभागातील विद्यार्थ्यांना जात पडताळणीमध्ये अडचणी

Patil_p
error: Content is protected !!