Tarun Bharat

यरनाळ रामलिंग तलावात बुडून चार जनावरांचा बुडून मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / तवंदी : यरनाळ तालुका निपाणी येथील रामलिंग तलावात चार जनावरांचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे शेतकरी सदाशिव बाबर यांचे सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले. या मुक्या जनावरांचा बुडून मृत्यू झाल्याने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की सदाशिव बाबर हे आपली बैलगाडी घेऊन तलाव परिसरात गेले होते. यावेळी बैलगाडीच्या मागील बाजूस दोन म्हशी बांधल्या होत्या. तालवानजीक गेले असता बैल बुजल्याने तलावात अचानक गेले त्यापाठोपाठ बैलगाडीच्या मागे बांधलेल्या दोन म्हशी ही त्या पाठोपाठ गेल्याने चारीही जनावरांचा या तलावात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे सदाशिव बाबर या शेतकऱ्यांचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. गत दोन वर्षापासून शेतकरी चिंताग्रस्त असून त्यातच पुन्हा चारही जनावरे मेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Stories

एपीएमसी रोडवरील ट्रान्स्फॉर्मर हटविण्याची मागणी

Amit Kulkarni

जमिनीचा कब्जा घेण्यासाठी दमदाटी

Amit Kulkarni

बेळगुंदी-पिरनवाडी परिसरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी

Patil_p

संभाजी भिडेगुरुजी यांचे वॉरंट रिकॉल

Amit Kulkarni

कणबर्गी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा विद्यार्थ्यांचे यश

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंटमधील लीज संपलेल्या जागांना मिळणार मुदतवाढ

Omkar B
error: Content is protected !!