ओडिशात चांदीच्या विटा, रोकड जप्त
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कोलकाता शहराच्या हद्दीजवळच 11 किलो सोन्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. बेलघरिया एक्स्प्रेस वेवर तपासणी सुरू असताना कारमधील प्रवाशांची चौकशी करण्यात आली. योग्य उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यात 11 किलो सोने सापडले. सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत 55 कोटी रुपये इतकी आहे. मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयितांच्या व्यवहारांबाबत तपास सुरू आहे. तसेच तस्करीच्या अनुषंगानेही या घटनेकडे पाहिले जात आहे.
पश्चिम बंगालबरोबरच ओडिशामध्येही अशाच एका कारवाईत चांदीच्या विटा आणि मोठी रोकड जप्त केली आहे. उत्पादन शुल्क विभागाने ओडिशातील कटक येथे छापे मारून 100 किलो चांदीच्या विटा आणि 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अमली पदार्थाच्या तपासणीवेळी एका वाहनात चांदीच्या विटा आणि पैसे सापडले. याप्रकरणी चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी जीएसटी अधिकाऱयांना माहिती दिली आहे.