Tarun Bharat

चार हस्तक अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था

कुप्रसिद्ध दहशतवादी संघटना अल् कायदा आणि पाकिस्तानी तालिबान यांच्या चार हस्तकांना अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री टोनी ब्लिंकन यांनी या दहशतवाद्यांना कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. अफगाणिस्तानात दहशतवाद्यांना मोकळे रान मिळू न देण्यासाठी अमेरिका दक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ओसामा मेहमूद, अतीफ याहय़ा घौरी, मुहम्मद मारुफ आणि कारी अमजद अशी या दशहतवाद्यांची नावे आहेत. ते अल् कायदा आणि पाकिस्तानी तालिबानच्या विविध शाखांचे नेतृत्व करतात. आता त्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आल्याने त्यांची जगातील सर्व मालमत्ता आणि त्यांच्याशी संबंधित मालमत्ता, जी अमेरिकेच्या कार्यकक्षेत येते, ती जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांची बँकखातीही गोठविण्यात येत आहेत.

अफगाणिस्तानच्या हितासाठी

हा निर्णय अफगाणिस्तानच्या हितासाठी घेण्यात आला आहे. अफगाणिस्तानात दहशवाद्यांचा सुळसुळाट वाढला असून त्यांना तेथे मुक्तद्वार मिळू नये, यासाठी अमेरिकेचे प्रयत्न आहेत. अमेरिका यासाठी कोणतीही कारवाई करण्यास तयार असून स्वतःचे उत्तरदायित्व आम्ही योग्यरित्या पार पाडत आहोत. दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत, असे प्रतिपादन ब्लिंकन यांनी केले.

संपर्कात असलेल्यांना इशारा

दहशतवाद्यांच्या संपर्कात कोणी असेल आणि त्यांना सहकार्य करीत असेल, तर अशा व्यक्तींना अगर संस्थांनाही हा इशारा आहे. त्यांच्यावरही कठोर कारवाई होऊ शकते. अशा व्यक्ती किंवा संस्थांचीही मालमत्ता जप्त केली जाऊ शकते, तसेच त्यांची बँक खाती गोठविली जाऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवी दहशतवादी संघटना

2014 मध्ये एका नव्या दहशतवादी संघटनेचा जन्म झाला आहे. ती एक्यूआयएस (अल् कायदा इस्लामिक स्टेट) या नावाने ओळखली जाते. ही इस्लामी दहशतवादी संघटना असून पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत, म्यानमार आणि बांगलादेश या देशांच्या सरकारांविरोधात दहशतवादी मार्गाने संघर्ष करण्यासाठी ती स्थापन करण्यात आली आहे, असे या संघटनेचेच म्हणणे आहे.

Related Stories

ब्राझीलने कोरोना आकडेवारी हटविली

Patil_p

कोलंबियात कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 10 लाखांचा टप्पा

datta jadhav

निर्बंध आणखी कठोर

Patil_p

श्वानासारख्या रोबोटमुळे अमेरिकेत खळबळ

Patil_p

रशियात कोरोनाबाधितांची संख्या 9 लाखांवर

datta jadhav

पाय नाहीत, निर्धाराचे पंख आहेत

Patil_p