बेळगाव : बळ्ळारी येथे सबज्युनियर मुला-मुलींच्या 14 वर्षाखालील राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचे जेएसडब्लूतर्फे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी बेळगावचे चार बॉक्सर बळ्ळारीला रवाना झाले आहेत.
त्यामध्ये प्रितम शेट्टर 33-35 वजनी गटात, 40-43 वजनी किलो गटात श्रवण पाटील व प्रतीक्षा कांबळे तर 50-58 किलो गटात ज्ञानेश्वरी धुडुम हे चार खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. नुकत्याच झालेल्या मिनी ऑलिंपिक स्पर्धा आटपून हे चारही खेळाडू बळ्ळारीला रवाना झाले आहेत. वरील सर्व खेळाडूंना अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.