प्रतिनिधी /काणकोण
काणकोण पालिका क्षेत्रात पाटणे येथे सर्व्हे क्र. 66/12 या जमिनीत किनारा नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करून उभारलेली 220.30 चौरस मीटर जागेमधील 4 बांधकामे काणकोणच्या मामलेदार कार्यालयाने कडेकोट बंदेंबस्तात जेसीबीच्या साहाय्याने हटविली. यावेळी मामलेदार मनोज कोरगावकर, काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस, सीआरझेडचे विघ्नेश नाईक, बाळकृष्ण सुर्लकर उपस्थित होते. मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटा आणि वीजखाते तसेच अग्निशामक दलाचे कामगार तैनात करण्यात आले होते. किनारा नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करून या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सदर बांधकामांसंबंधी कित्येक तक्रारी होत्या, अशी माहिती मामलेदार कोरगावकर यांनी दिली.