Tarun Bharat

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पुण्यातील चार नृत्य समुहांचा सहभाग

पुणे / प्रतिनिधी :

प्रजासत्ताक दिनी ‘कर्तव्यपथ’ असे नामकरण झालेल्या दिल्ली येथील पथसंचलनामध्ये पुण्यातील चार नृत्य समुहांना सादरीकरण करण्याची संधी मिळणार असून, त्यासाठी चारही नृत्य समूहातील नृत्य कलाकारांची जल्लोषात तयारी सुरू आहे.

गुरुवारी (दि.26) साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी पथसंचलनात चारही समूह कथक या शास्त्रीय नृत्याचे प्रतिनिधित्त्व करणार आहेत. टांझ कथक अकॅडमी, मनीषा नृत्यालय, अभिव्यक्ती स्कूल ऑफ कथक यासह उस्ताद जाफर मुल्ला खान व अविनाश बेलसरे यांचे शिष्य पथसंचलनात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, देशभरातून घेतलेल्या विविध पातळीवरील निवड प्रक्रियेतून या कलाकारांची निवड झाली आहे. चार नृत्य समूहातील नृत्य कलाकार ज्येष्ठ नृत्य गुरु मनीषा साठे, नृत्य गुरु तेजस्विनी साठे, अमृता गोगटे -परांजपे, उस्ताद जाफर मुल्ला खान व अविनाश बेलसरे) यांच्या विद्यार्थिनी आहेत.

याबाबत बोलताना तेजस्वीनी साठे म्हणाल्या, यंदा पथसंचलनात पुण्यातील चार ग्रुप सादरीकरण करणार आहेत. कलेद्वारे देशासाठी काहीतरी समर्पण केल्याची भावना या चार ग्रुपमधील कलाकारांमध्ये आहे. नारी शक्ती ही कार्यक्रमाची संकल्पना असणार आहे. पंचतत्त्व ते नारीशक्तीचा संदेश देणार आहेत. माझ्या काही विद्यार्थिनी यंदा सादरीकरण करणार आहेत. पुण्यातील चार ग्रुपची निवड झाल्याची गोष्ट अभिमानास्पद आहे. चारही ग्रुपमधील विद्यार्थिनी मोठय़ा मेहनतीने सराव करीत आहेत.

Related Stories

राजीव बजाज यांच्या वक्तव्याला राजकीय वास!

datta jadhav

मंत्री दादा भुसेंची तरुणाला पोलिसांसमोरच मारहाण; आव्हाडांकडून व्हिडिओ ट्विट

datta jadhav

महाराष्ट्रातही सत्तांतर होणार; फडणवीसांचं सूचक विधान

Archana Banage

हिंदू समाज नपुसंक कधी झाला कळलचं नाही- अभिनेते शरद पोंक्षे

Abhijeet Khandekar

नात्याला काळीमा फासणारी घटना! सख्ख्या काकानेच केला 2 अल्पवयीन पुतणींवर बलात्कार

datta jadhav

“अजित दादा आमचं ऐका, नाहीतर… ”

Archana Banage