विविध मान्यवर तज्ञ व्यक्तींची नियुक्ती
प्रतिनिधी /पणजी
गोवा टुरिझम बोर्डावर (पर्यटन मंडळ) 4 तज्ञ मान्यवरांची नेमणूक करण्यात आली असून पर्यटन वाढीसाठी 4 सशक्तीकरण समित्यांची स्थापनाही झाली आहे. पर्यटन खात्यातर्फे हे काम करण्यात आले असून खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी तसा आदेश जारी केला आहे.
गोवा राज्यात पर्यटनाचे नियोजन, धोरणे, विविध प्रकारचे पर्यटनाशी संबंधित कार्यक्रम, उपक्रम यांची आखणी कार्यवाही करण्यासाठी मंडळाची स्थापना यापूर्वीच करण्यात आली होती. त्यावर आता 4 नामवंतांची वर्णी लावण्यात आली आहे. अर्नेस्ट डायझ – टूर टॅव्हल चार्टर, पराग अजित रांगणेकर – इको टुरिझम, संजीव सरदेसाई – वारसा संस्कृती, मार्क ऍ़ंथनी मेंडीस् ा क्रूझ पर्यटन मार्केटींग सल्लागार अशी त्यांची नावे असून ते पर्यटनाच्या विविध क्षेत्रातील नामवंत आहेत.
ही नियुक्ती दोन वर्षासाठी असून गरज भासली तर त्यांची मुदत आणखी दोन वर्षांनी वाढवण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. गोव्यातील पर्यटन वाढ – विकास याची अंमलबजावणी करता यावी म्हणून 4 सशक्तीकरण समित्यांची स्थापनाही करण्यात आली आहे. परवाने, नियम ा अटी, साधन ा सुविधा, मार्केटींग-जनसंपर्क अशा विविध क्षेत्रात काम करण्यासाठी आणि पर्यटन फुलावे म्हणून त्या समित्या काम करणार आहेत. पर्यटनमंत्री, पर्यटन सचिव, पर्यटन खाते संचालक, टुरीझम बोर्ड सीईओ, पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशा माणसांना 4 समित्यांवर नेमण्यात आले आहे.