Tarun Bharat

शिरुर येथील अपघातात चार ठार

उडुपी जिल्हय़ातील दुर्घटना / तिघेजण गंभीर

कारवार : उडुपी जिल्हय़ातील शिरुर येथील टोलनाक्याला रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिल्याने होन्नावर तालुक्यातील चार जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची भीषण घटना बुधवारी दुपारी 4 वाजता घडली.

लोकेश नाईक, पत्नी गीता नाईक, मंजुनाथ महादेव नाईक (रा. हाडगेरी ता. होन्नावर) आणि गजानन लक्ष्मण नाईक (रा. बळकुरी, ता. होन्नावर) अशी ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. जखमींची नावे समजू शकली नाहीत. होन्नावर तालुक्यातील कवलक्की येथील मंजुनाथ नाईक यांच्या दुकानात काम करणाऱया गजानन नाईक यांना होन्नावर येथील श्रीदेवी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गजानन यांना पुढील उपचारासाठी बुधवारी रुग्णवाहिकेतून मणिपालला नेण्यात येत होते. रुग्णवाहिका वेगाने जात असताना शिरुर येथील टोल नाक्यावरील रस्त्यावर गाय झोपल्याचे दिसून आले. यामुळे रुग्णवाहिकेच्या चालकाने बेक मारला असता त्याचे रुग्णवाहिकेवरील नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिकेने टोलनाक्याला जोराची धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, रुग्णवाहिकेतून तिघे जण बाहेर फेकले गेले. या अपघातात रुग्णासह चौघेजण ठार झाले.

या अपघाताचे भयावह दृश्य टोलनाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या अपघातात रुग्णवाहिकेच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला होता. उडुपी जिल्हा पोलीस याचा अधिक तपास करीत आहे.

Related Stories

धामणेत बसवाण्णा देवाचा यात्रोत्सव उत्साहात

Amit Kulkarni

एल्गार साहित्य परिषदेतर्फे नंदन मक्कळधामला फराळ वाटप

Omkar B

16 फेब्रुवारीपासून करता येणार जोधपूर विमान प्रवास

Amit Kulkarni

मतांच्या जोगव्यासाठी अपप्रचार

Omkar B

टाकाऊ मातीसंदर्भात बैलूर ग्रा.पं.मध्ये गोंधळ

Amit Kulkarni

अंगणवाडी सेविका-मदतनीस भरती प्रक्रिया रखडली

Patil_p