अंकोलानजीक दुर्घटना : मृत तामिळनाडूतील
वार्ताहर /रामनगर
नववर्ष साजरे करून जाणारे तामिळनाडू येथील चौघेजण कार आणि बस अपघातात ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी अंकोलानजीक असणाऱ्या बाळेगुळी राष्ट्रीय महामार्गावर घडले.
कारवार येथून अंकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या टीएन 11 एव्ही 9876 क्रमांकाच्या कारने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या गोकर्ण-हुबळी केए 63 एफ 0154 या बसला धडक दिल्याने तामिळनाडू येथील चारजण जागीच ठार झाले. तर एका जखमीला कारवार येथील सरकारी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच अंकोला येथील पोलीस निरीक्षक संतोष शेट्टी, पीएसआय प्रवीण कुमार, साहाय्यक महांतेश वाल्मिकी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.