Tarun Bharat

चार महिने पूर्ण, तरीही सर्व्हरची समस्या जैसे थे

हेस्कॉमच्या गलथान कारभाराला ग्राहक हैराण : सायंकाळीही सर्व्हर नसल्याने तोडगाही अपयशी

प्रतिनिधी /बेळगाव

नागरिकांना नवीन कनेक्शन घेणे, अधिक लोड मंजूर करून घेणे यासाठी सर्व्हरची आवश्यकता असते. परंतु मागील 4 महिन्यांपासून हेस्कॉमच्या सर्व्हरमध्ये वारंवार बिघाड होत आहे. संपूर्ण कर्नाटकात ही परिस्थिती असल्यामुळे सरकारचे हे अपयश असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे विद्युत योजनांसाठी सरकार लाखो रुपये खर्च करत असताना दुसरीकडे मात्र चांगल्या दर्जाचा सर्व्हर देण्यात अपयश येत आहे. यामुळे विद्युत विभागावर नामुष्की ओढवली असून यातून तोडगा काढणे आवश्यक आहे.

राज्यातील विद्युत विभागाने सर्व्हर डाऊनच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 यावेळेत बेंगळूर व म्हैसूर या जिल्हय़ांना सर्व्हरचे कनेक्शन दिले जाते. तर बेळगावसह उर्वरित राज्यात दुपारी 1.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत कनेक्शन दिले जाते. परंतु सायंकाळीही बेळगावमध्ये सर्व्हर येत नसल्याने हा तोडगाही अपयशी ठरत आहे. इन्फोसिस कंपनीनंतर आणखी एका कंपनीकडे सर्व्हरची व्यवस्था देण्यात आली. परंतु काहीच दिवसांत ती पुन्हा विद्युत विभागाकडे आली. त्यामुळे सध्या विद्युत विभागाकडूनच सर्व्हरची संपूर्ण यंत्रणा सांभाळली जात आहे.

सर्व्हर बॉक्सची दुरुस्ती नाहीच

रेल्वेस्टेशन येथील हेस्कॉम कार्यालयातील सर्व्हर बॉक्समध्ये बिघाड होऊन चार महिने होत आले तरी अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे तीनपैकी केवळ एकाच सर्व्हर बॉक्सवर काम ओढून काढावे लागत आहे. शहरातील अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळेच हे प्रकार होत आहेत. हेस्कॉम प्रशासनाला कोणी जाब विचारत नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

सलग दुसऱया दिवशी कोरोनाचा आणखी एक बळी

Amit Kulkarni

रेल्वेखाली तरूणाची आत्महत्या

Tousif Mujawar

म. ए. समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांचे भव्य पुष्पहार घालून जंगी स्वागत

Rohit Salunke

केवळ उमेदवाराचे ‘नो डय़ूज’ प्रमाणपत्र सक्तीचे

Amit Kulkarni

आत्महत्या, दफनविधी अन् नंतर शवविच्छेदन

Amit Kulkarni

कर्नाटक-महाराष्ट्र बससेवेला प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!