Tarun Bharat

रवी शिरोडकर खुनी हल्ला प्रकरणी आणखी चार जणांना अटक

Advertisements

टारझन पार्सेकरला हद्दपार करण्याची कळंगुटवासियांची मागणी : गुंडगिरी करणाऱयांची गय नाहीः पोलिसांचा इशारा

प्रतिनिधी /म्हापसा

हडफडे नागवा येथे झालेल्या खूनी हल्ला प्रकरणी हणजूण पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी टारझन पार्सेकर याच्यासह अन्य चार जणांना अटक केली आहे. परवा पहाटे दारूच्या नशेत टारझन याने कळंगूट येथील रवी शिरोडकर याच्या पोटावर सपासप चाकूने वार करून पळ काढला होता. मात्र तक्रार नोंद होताच हणजूण पोलिसांनी तासाभरातच टारझन याला पकडण्यात यश मिळविले होते. विशेष म्हणजे टारझन याची बार्देश भागात दहशत असून विविध गुन्हय़ात त्याचा हात आहे. त्याच्या दहशतीमुळे पोलीसही हैराण झाले असून त्याच्या माथेफिरू वृत्तीमुळे त्याने अनेकांना मारहाण केली आहे. दरम्यान, संशयित आरोपी टारझन पार्सेकर याला येथून हद्दपार कारावे, अशी मागणी कळंगूटवासियांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

.  यापूर्वी पोलीस, आमदारांनाही मारण्याचा प्रयत्न

 पोलीस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार टारझन याला यापूर्वी विविध गुन्हय़ांत उत्तर गोव्यातील पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी मागणे, बळजबरी, हल्ला करणे, जबरदस्तीने पैसे उकळणे, हप्ते घेणे अशा विविध गुन्हय़ांत त्याचा सहभाग आहे. विशेष म्हणजे काही पोलिसांवर तसेच एका आमदाराच्या पाठीमागेही तलावर घेऊन हल्ला करण्यात धावला होता, अशी माहिती हाती आली आहे. त्याच्या दहशतीमुळे पोलिसांनीही मौन धारण केले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. एका ‘सूर्या’ नामक इसमाचे गैरधंदे चालविण्यासाठी टारझनचा वापर केला जातो. किनारी भागात ‘लाल पे काला, काले पे लाल’ हा जुगार सुरू करून हातोहात हजारो रुपयांना पर्यटकांना लुटतात. जर कुणी त्याविरुद्ध आवाज केला तर टारझन व इतर साथीदारांचा वापर सूर्या नामक इसम करतो, असेही सांगण्यात आले. हणजूण कळंगूट भागात आजवर आलेल्या पोलीस अधिकाऱयांनी या धंद्यावर तसेच ‘सूर्या’ला या भागात असे गैरकृत्य धंदे करण्यास पूर्णपणे बंदी घातली होती, मात्र काही दिवसांपूर्वीच उपअधीक्षपदी बढती झालेल्या एका अधिकाऱयाने काले पे लाल, लाल पे काला हा जुगाराचा धंदा करण्यास परवानगी दिली हेती. त्यामुळे खंडणी तसेच हप्ते वसूल करण्यासाठी या काही संशयितांनी आपले डोके वर काढले होते, अशी माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली. 

अन्य चौघांना अटक

 रविवारी पोलिसांनी या प्रकरणी शैलेश चंदू नाईक, रा. कामुर्ली, सिद्धांत मांद्रेकर रा. साळगाव, अमन रोहिदास शिरोडकर रा साळगाव, प्रशांत दासा राजू रा. नागवा या चार जाणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. दरम्यान, त्या दिवशी पहाटे टारझन पार्सेकर याच्यासह 17 जण या मारहाणीत गुंतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अन्य बाजणांचा शोध पोलीस घेत आहेत. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी  गांभीर्याने घेतले असून कायदा सुव्यवस्था बिघविणाऱयांची आपण गय करणार नाही. असा आदेश पोलिसांना दिला आहे. सर्व हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यात येतील, असे मुख्यंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

आता पसार झालेल्या संशयितांना ताब्यात घेणार

या प्रकरणी पोलीस विभागीय उप अधीक्षकांनी संशयितांना पकण्यासाठी तीन पालीस पथके तयार केली असून ते संशयितांची कसून शोध घेत आहेत. सर्व आरोपींनी पोलिसांच्या स्वाधीन व्हावे, अन्यथा सर्व संशयितांच्या कुटुंबियांना प्रतिबंधात्मक कायद्यानुसार पोलीस स्थानकात आणून ठेवले जाईल, असे सांगण्यात आले. आपल्या हद्दीत गुंडगिरीला थारा नाही, असे पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले. हणजूण पोलीस निरीक्षक प्रशल देसाई,म्हापसा पोलीस निरीक्षक परेश नाईक, उपनिरीक्षक तेजस कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकांनी विविध ठिकाणी छापे मारून सदर चौघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. इतरांना शोध सूरू आहे. दरम्यान, रवी शिरोडकर याची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्याला अतिदक्षता विभागात ठेवले आहे.

Related Stories

संततधार पावसामुळे पेडणे तालुक्यात पडझड

Amit Kulkarni

पक्ष हितापेक्षा म्हादईचे हित सर्वोच्च

Amit Kulkarni

वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्यावर वाढदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

Patil_p

देशाच्या विकासासाठी भाजपाला गोवा जिंकणे महत्वाचे – जी किशन रेड्डी

Amit Kulkarni

‘आयव्हर्मेक्टिन’च्या वापराला मंजुरी

Amit Kulkarni

मुख्यमंत्री पदाचा चेहरा येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!