Tarun Bharat

कलिंगा स्टेडियमवर चार नव्या टर्फची सुविधा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2023 च्या जानेवारी महिन्यात येथे होणाऱया आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर तसेच रुरुकेला बिरसा मुंडा स्टेडियमवर स्पर्धा आयोजकांनी चार नवे टर्फ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

या स्पर्धेमध्ये जगातील अव्वल 16 संघ सहभागी होणार असून त्यामध्ये यजमान भारताचाही समावेश आहे. सदर स्पर्धा 13 ते 29 जानेवारी दरम्यान ओदिशामध्ये होणार असून या स्पर्धेतील सामने कलिंगा स्टेडियम आणि मुंडा स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणारे 16 संघ चार गटात विभागण्यात येणार आहेत. यजमान भारताचा ड गटात समावेश असून या गटामध्ये इंग्लंड, स्पेन आणि वेल्स यांचा समावेश आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर हॉकीपटूंच्या सरावासाठी टर्फची सुविधा त्याचप्रमाणे प्रमुख पिचवर टर्फ उपलब्ध करून दिले जाईल. अ गटामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, ब गटामध्ये बेल्जियम, जर्मनी, कोरिया आणि जपान, क गटामध्ये नेदरलँड्स, मलेशिया, न्युझीलंड आणि चिली यांचा समावेश आहे. या स्पर्धेतील 24 सामने भुवनेश्वरमध्ये खेळविले जाणार असून उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामन्याचा यामध्ये समावेश आहे. रुरुकेलामध्ये एकूण 20 सामने होतील. यजमान भारताचे पहिले दोन लीग सामने 13 आणि 16 जानेवारीला होतील.

Related Stories

श्रीकांत, सिंधू, प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

कुस्तीशौकिनांना हुरहूर राहुलच्या हुकलेल्या विजयाची

datta jadhav

बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद यांची 26 लाखांची मदत

Patil_p

प्रो कब्बडी लीग हंगामाला 21 डिसेंबरला प्रारंभ

Patil_p

दुसऱया कसोटीसाठी लंका संघ जाहीर

Patil_p

कोव्हिडच्या अस्मानी संकटात विंडीज संघ इंग्लंडमध्ये दाखल

Patil_p