प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ातील चौघा जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी केवळ 1 नवा रुग्ण आढळून आला असून कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. अद्याप 16 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 766 वर पोहोचली आहे. यापैकी 1 लाख 742 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. 16 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
केवळ बेळगावच नव्हे तर संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट सुरूच आहे. सोमवारी राज्यातील 93 जणांनी कोरोनावर मात केली असून 116 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात 3 हजार 5 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. नेहमीप्रमाणे जिल्हा आरोग्य विभागाने मात्र गेल्या आठवडाभरात हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आली नाही.