रायपूर :
छत्तीसगडमधील जशपूर जिह्यात शुक्रवारी रात्री एका हत्तीने चार जणांना चिरडून ठार केले. मृतांमध्ये एका मुलासह एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. हे संपूर्ण प्रकरण बगिचा नगर पंचायतीच्या गमहरिया गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हत्तीने अंधारात हल्ला केला. घरात झोपलेले वडील, मुलगी आणि काका यांना हत्तीने तुडवून ठार केले. यादरम्यान आवाज ऐकून शेजारचा एक तऊण बाहेर आला असता त्यालाही हत्तीने हल्ला करून ठार केले. मृतांमध्ये वडील रामकेश्वर सोनी (35), मुलगी रविता सोनी (9), काका अजय सोनी (25), शेजारी अश्विन कुजूर (28) यांचा समावेश आहे.