Tarun Bharat

अपहरणप्रकरणी चारजणांना अटक

पैसे घेऊनही नोकरी न दिल्याने अपहरण केल्याची संशयितांकडून कबुली

प्रतिनिधी/ पणजी

हळदोणा येथील आलेक्सीयो लॉरेन्सो (50) याचे दोनापावला येथून अपहरण करुन मारहाण तसेच 15 लाख रुपयांची मागणी करणाऱया चार संशयितांना पणजी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरोधात भादंसं 342, 363, 326, 384, 323 कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. संशयितांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या संशयितांमध्ये ऍस्टीन ऍन्थॉनी लॉरेन्सो (29, गिरी – म्हापसा), साईश अनिल पार्सेकर (25, सांगोल्डा), रशीद अक्बाल शेख (25, शेळपे), विनोद जगन्नाथ गायकवाड (40, चिंबल) यांचा समावेश आहे. या प्रकरणात पुजा दांडी व राहुल यांचेही तक्रारीत नाव असून   पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

आलेक्सीयो लॉरेन्सो याने विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून संशयितांकडून काही पैसे घेतले होते. कित्येक दिवस झाले तरी त्यांना नोकरी दिलीच नाही. शिवाय पैसेही परत दिले नाही. दिलेले पैसे वसूल करण्यासाठी संशयितांनी बुधवार दि. 28 रोजी 12.30 च्या सुमारास दोनापावला येथील एका बारमधून आलेक्सीयो लॉरेन्सो याचे अपहरण पेले. त्याला विविध ठिकाणी नेऊन मारहाणही केली तसेच त्याच्याकडून 76 हजार वसूल केले व 15 लाख रुपये देण्याची मागणी केली. या बाबत तक्रार केल्यास किंवा अन्य कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

आलेक्सीयो लॉरेन्सो याची संशयितांच्या तावडीतून सुटका होताच त्याने पणजी पोलीस स्थानक गाठले आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगिला. संशयितांच्या विरोधात तक्रार नोंद करून अवघ्या काही तासातच पणजी पोलासंनी संशयिताना अटक केली आहे. पणजी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अल्लाहुद्दीन खान पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानच्या जत्रोत्सवाची सांगता

Patil_p

रविवारी राज्यात 11365 जणांचे लसीकरण

Amit Kulkarni

केपे पालिकेत 4 उमेदवारी अर्ज दाखल

Patil_p

राज्यात 8 डिसेंबरपासून पावसाची शक्यता

Amit Kulkarni

दिव्यांगासाठी जानेवारीत ‘पर्पल महोत्सव’

Amit Kulkarni

‘झुआरी ऍग्रो’ जमिनीचा ‘झोन’ का बदलला?

Amit Kulkarni
error: Content is protected !!