Tarun Bharat

अक्कलकोट शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच वेळी चार दुकाने फोडली

शटर उचकटून रोकड लंपास

Advertisements

प्रतिनिधी/अक्कलकोट

अक्कलकोट शहरातील समर्थ नगर परिसरात पहाटेच्या वेळी चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार दुकानांचे शटर उचकटून दुकानातील रोकड लंपास केली आहे. ही घटना दि २२ रोजी पहाटेच्या वेळी उघडकीस आली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , अक्कलकोट मधील समर्थ नगर येथील विशाल वासुदेव राठोड यांचे व्ही आर लेडीज जिन्स कॉर्नर लोखंडी शटरचे कुलूप उचकटून शटर उघडून दुकानातील पैशाच्या गल्ल्यातील १९ हजार रुपये व तसेच त्या दुकांनाच्या बाजूचे धनराज होटकर यांचे सरस्वती स्टेशनरी दुकानातील २५० रुपये, व बाजूला असलेले मनीष धाराशिवकर यांचे अक्षय मेडिकल स्टोअर्स आणि महेश पत्रिके यांचे ओम ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर ८००० रुपये रोख रक्कम या सगळ्यांचे दुकान एकाच पद्धतीने फोडून २७,२५० रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले.

अक्कलकोट शहरातील समर्थ नगर परिसरात एकाच वेळी चार दुकाने फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने शहरात सध्या भीतीचे वातावरण आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध विशाल वासुदेव राठोड यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी व फाँरेन्सिक पथक प्रमुख सपोनि जालिंदर गळवे, हवालदार सादुल, काँन्स्टेबल चिन्यम कुलकर्णी व श्वानपथकानी भेटी दिल्या. पुढील तपास पोलीस हवालदार असिफ शेख करीत आहेत

Related Stories

वीज बिल वसुलीची सक्ती न करण्यासाठी कर्मचाऱ्यांचेच आंदोलन

Abhijeet Shinde

अकलूजमध्ये गड आला पण सिंह गेला

Abhijeet Shinde

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या संचालक,सीईओ पदी आयुक्त पी.शिवशंकर यांची निवड

Abhijeet Shinde

अक्कलकोट येथे बाजारसाठी आलेल्या महिलेच्या पैशावर चोरट्याचा डल्ला

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये 56 नवे कोरोना रुग्ण

Abhijeet Shinde

सोलापूर : शहरात ४८ तर ग्रामीणमध्ये ३१ पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!