एपीएमसी पोलिसात फिर्याद दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या चार दुचाकी अज्ञातांनी पेटविल्या आहेत. शनिवारी मध्यरात्री नेहरूनगर परिसरात ही घटना घडली असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
शनिवारी मध्यरात्री आगीची ही घटना घडली आहे. चारही दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. हा प्रकार उघडकीस येताच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. बंब दाखल होईपर्यंत दुचाकी जळाल्या होत्या. त्यानंतर एपीएमसी पोलिसांना माहिती देण्यात आली.
या घटनेमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. समाजात अशांतता माजविण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे की आणखी कोणत्या कारणासाठी? याचा तपास करण्यात येत आहे. यासंबंधी एपीएमसी पोलिसांशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाला असून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.