Tarun Bharat

फ्रान्सचा ऑस्ट्रेलियावर 4-1 ने विजय

Advertisements

ऑलिव्हरचे दोन, एम्बापे, राबियॉटचा प्रत्येकी एक गोल

अल वक्राह, कतार

विद्यमान चॅम्पियन फ्रान्सने आपल्या मोहिमेची सुरूवात दमदार विजयाने करताना ऑस्ट्रेलियाचा पिछाडीनंतर 4-1 असा पराभव केला. या विजयाने फ्रान्सला तीन गुण प्राप्त झाले. फ्रान्सच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला तो त्यांच्या स्टार खेळाडू किलियान एम्बापेने. हा सामना अल-जनौब स्ह्टेडिमवर खेळविण्यात आला.

किलियान एम्बापेने प्रामुख्याने दुसऱया सत्रात उत्कृष्ट खेळ करताना एक गोल केला आणि फ्रान्सचे अन्य गोल होण्यासही तो कारणीभूत ठरला. फ्रान्ससाठी ऑलिव्हर गिरौडने दोन व ऍड्रियान राबियॉटने एक गोल केला. या सामन्यात 71 व्या मिनिटाला ऑलिव्हरने 51 गोल केलेल्या थियरी हेन्रीच्या राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी केली. मागच्या वर्ल्ड कपमध्ये ऑलिव्हरला गोल नोंदवता आला नव्हता. आता डेन्मार्कविरुद्ध होणाऱया सामन्यात त्याला हेन्रीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. करिम बेन्झेमा जखमी असल्याने तो स्पर्धेत खेळू शकणार नसल्याने फ्रान्सला त्याच्याशिवाय खेळावे लागत आहे.

ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या नवव्याच मिनिटाला गोल करून फ्रान्सच्या पाठिराख्यांना थक्क केले. क्रेग गुडविनने फ्रान्सचा गोलरक्षक हय़ुगो लॉरीसला भेदले आणि चेंडूला गोलमध्ये टाकले. ऑस्टेलियाला आरंभालाच मिळालेली आघाडी जास्त वेळ टिकवता आली नाही. थिओ हर्नांडिझने केलेल्या क्रॉसवर ऍड्रियान राबियॉटने 27 व्या मिनिटाला जबरदस्त हेडरवर प्रतिस्पर्धी गोलरक्षक मॅट रायनला चकवित फ्रान्सचा बरोबरीचा गोल केला.

लगेच पाच मिनिटांनी फ्रान्सने आघाडीचा गोल केला. ऍड्रियान राबियॉटने दिलेल्या पासवर ऑलिव्हर गिरौडने हा गोल केला. दुसऱया सत्रातील खेळावर पूर्णतः  फ्रान्सचे वर्चस्व राहिले. प्रथम 68 व्या मिनिटाला उस्मान डेम्बेलेच्या पासवर किलियान एम्बापेने हेडरवर गोल केल्यानंतर तीन मिनिटांनी किलियान एम्बापेने दिलेल्या क्रॉसवर ऑलिव्हर गिरौडने फ्रान्सचा चौथा गोल करून विजय अधिक सोपा केला. आता 26 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाची लढत टय़ुनिशियाशी तर फ्रान्सचा सामना डेन्मार्कशी होईल. 

Related Stories

भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

Patil_p

गुजरात जायंट्सच्या विजयाची हॅट्ट्रिक

Amit Kulkarni

हॉलंडचा अष्टपैलू डुश्चे क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

हैदराबादसमोर आज ‘टेबलटॉपर्स’ चेन्नईचे तगडे आव्हान

Patil_p

भारताची रविना उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन विजयी, सायना दुखापतीमुळे बाहेर

Amit Kulkarni
error: Content is protected !!