वृत्तसंस्था/ पॅरीस
फ्रान्सच्या फुटबॉल संघाचा कर्णधार हय़ुगो लॉरीसने सोमवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. 36 वर्षीय लॉरीसने तब्बल 14 वर्षे फ्रान्स फुटबॉल संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.
2018 साली फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱया फ्रान्स संघामध्ये त्याचा समावेश होता. तसेच 2020-21 च्या कालावधीत नेशन्स चषक जिंकणाऱया फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद लॉरीसने भूषवले होते. कतारमध्ये नुकत्याच झालेल्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद मिळवणाऱया फ्रान्सचे नेतृत्व लॉरीसने केले होते. कतारच्या स्पर्धेत अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टीमध्ये पराभव करून केला होता. लॉरीसने आपल्या फुटबॉल कारकीर्दीत 145 सामन्यात फ्रान्सचे प्रतिनिधीत्व केले असून फ्रान्सच्या फुटबॉल क्षेत्रातील महत्त्वाचा फुटबॉल खेळाडू म्हणून गणला गेला. लॉरीसने 121 सामन्यात फ्रान्सचे नेतृत्व केले.