Tarun Bharat

शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

Advertisements

काँग्रेस खासदाराचा गौरव

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

केरळच्या तिरुअनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर यांना फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले आहे. थरूर यांना ‘शेवलियर डे ला लीजियन डी होनूर’ने (द लीजन ऑफ ऑनर) सन्मानित करण्यात आले आहे. थरूर हे संयुक्त राष्ट्रसंघात 23 वर्षांपर्यंत राजनयिक राहिले आहेत. अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. फ्रान्सने त्यांना हा पुरस्कार त्यांचे लिखाण आणि वक्तृव्यासाठी दिला आहे.

थरूर यांना 2010 मध्ये स्पेनच्या सरकारने रॉयल स्पॅनिश ऑर्डर ऑफ चार्ल्स तृतीयचा एनकोमिएन्डा (पुरस्कार) प्रदान केला होता. थरूर यांना ‘वर्डस्मिथ’ म्हणून ओळखले जाते. फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आल्यावर थरूर यांच्यावर ट्विटरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

फ्रान्ससोबतच्या आमच्या संबंधांना चालना देणारा, भाषेवर प्रेम करणारा आणि संस्कृतीची प्रशंसा करणारा व्यक्ती म्हणून ओळखला जात असल्याने गौरवाची अनुभूती होत आहे. या पुरस्कारासाठी मला योग्य मानणाऱया लोकांचे आभार मानत असल्याचे थरूर यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Related Stories

लखनौमध्ये भिंत कोसळून 9 मजुरांचा मृत्यू

Patil_p

सेन्सेक्सचा नवा उच्चांक

Abhijeet Shinde

राकेश टिकैत यांच्यावर बेंगळूरमध्ये शाईफेक

Patil_p

आसाम काँग्रेसला आणखी एक झटका

Patil_p

पुड्डुचेरी उपराज्यपालांविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Patil_p

पाकिस्तानमधून ताज हॉटेल उडवून देण्याची धमकी

datta jadhav
error: Content is protected !!