Tarun Bharat

दरमहा 18 हजारांची नोकरी देण्याचे सांगून फसवणूक

Advertisements

वर्क फ्रॉम होमच्या आशेने महिलांना ठकविले

प्रतिनिधी /बेळगाव

दरमहा 18 हजारांची नोकरी देण्याचे सांगून एका ठकसेनाने बेरोजगार महिलांची फसवणूक केली. याप्रकरणी शुक्रवारी रात्री टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केले असून वर्क फ्रॉम होमच्या आशेने फसवणूक करण्यात आली आहे.

सुधा बडीगेर (मूळची रा. उगरगोळ, सध्या रा. भाग्यनगर) या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून ऋषभ दिवाकर आल्वा (रा. पंचवटी कॉलनी, शिमोगा) याच्यावर भा.दं.वि. 420 कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

शेअरचॅट ऍपमध्ये ‘तनिषा जॉब व्हॅकेन्सी, वर्क फ्रॉम होम’ अशी जाहिरात झळकली होती. ही जाहिरात पाहून जाहिरातीत उल्लेख केलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यात आले. ऑनलाईन मार्केटिंग जॉब आहे. ग्राहकांचे कॉल येतात तुम्ही त्यांच्याशी संभाषण केले पाहिजेत. यासाठी तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येईल, असे सांगत प्रत्येक महिलेकडून गुगल पेच्या माध्यमातून प्रत्येकी 600 रुपये भरून घेण्यात आले.

यापुढे तुम्हाला दरमहा 18 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. तुम्ही सदस्यांची संख्या आणखी वाढवा असे सांगत ऋषभने महिलांना सदस्य संख्या वाढविण्यासाठी उत्तेजित केले. लॅपटॉप खरेदीसाठी 36 हजार 450 रुपये, स्कुटी खरेदीसाठी 57 हजार रुपये, सायकल खरेदीसाठी 9 हजार 360 रुपये असे एकूण 1 लाख 39 हजार 410 रुपये घेऊन नोकरी तर नाहीच घेतलेले पैसेही परत केले नसल्याचे सुधा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी त्याच्याजवळून जप्त केलेले आधारकार्ड, पॅनकार्डवर वेगवेगळी नावे आहेत, अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून दिवसभर फशी पडलेल्या महिलांनी पोलीस स्थानकासमोर ठाण मांडले होते. टिळकवाडी पोलीस तपास करीत आहेत.

Related Stories

बेळगाव बनतोय अमली पदार्थांचा ट्रांझिट पॉईंट

Patil_p

शुद्ध पाण्यासाठी 130 कोटींचा आराखडा

Omkar B

हर घर तिरंगासाठी स्वच्छता कामगारांना ध्वज

Omkar B

शिवप्रतिष्ठानतर्फे पूरग्रस्तांसाठी साहित्य संकलन

Amit Kulkarni

कारची धडक बसून महिला सफाई कर्मचारी ठार

Rohan_P

मराठा, करिअप्पा, एस. व्ही. कॉलनीत लसीचे वितरण

Patil_p
error: Content is protected !!