Tarun Bharat

नोकरी लावण्याच्या अमिषाने 5 लाखांची फसवणूक,संभाजीपूरच्या एकावर गुन्हा दाखल

शिरोळ (प्रतिनिधी)  -बीएसएनएल कंपनीत क्लार्क या पदावर नोकरी लावतो असे सांगून पाच लाख रुपये घेवून फसवणूक केल्याप्रकरणी भुपाल लक्ष्मण कोळी रा. संभाजीपूर ता.शिरोळ यांच्या विरोधात शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुनिता सागर हुपरे वय 50 रा.गणेश कॉलनी ओंकार बंगला संभाजीपूर यांनी शिरोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुनिता हुपरे यांची मुली श्‍वेतांजली सागर हुपरे (वय 23) व स्नेहल सागर हुपरे (वय 24) यांना संशयीत आरोपी भुपाल कोळी यांनी बीएसएनएल कंपनीत नोकरी लावतो असे अमिष दाखवून वेळोेवेळी रोखीने 5 लाख रुपये घेतले आहेत, दिलेली रक्कम फिर्यादी परत मागत असताना पैसे देत नाही तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणून फसवणूक केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. या प्रकरणी संशयीत आरोपी भूपाल कोळी याच्यावर शिरोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल पाटील करीत आहेत

Related Stories

शिरोळ येथील अपघातात एक जागीच ठार

Archana Banage

बालचमू रमले गड-किल्ल्यांच्या विश्वात

Archana Banage

कोल्हापूर : इचलकरंजी महावितरण कार्यालय तोडफोड प्रकरणाची ऊर्जामंत्र्यांकडून दखल

Archana Banage

बाजार समितीत पाहुणचार बंद

Archana Banage

महाराष्ट्रात मागील 24 तासात 11,766 नवे कोरोना रुग्ण; 8,104 जणांना डिस्चार्ज

Tousif Mujawar

Kolhapur : इथेनॉल निर्मितीतून ऊसाला साडेपाच हजार दर शक्य

Abhijeet Khandekar