प्रतिनिधी / बेळगाव : ऑर्थोपेडिक सर्जन सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशन, इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हाड तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन डॉ. हेमंत कौजलगी यांनी केले.
या शिबिरामध्ये रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णांना योग्यतो सल्ला देण्यात आला. बेळगावसह परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचा आम्हाला फायदा झाला अशी प्रतिक्रिया तपासणीसाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त केली.
कसबेकर मेटगुड क्लिनिकचे सीईओ डॉ. बी. एच. मेटगुड, आयएमए बेळगावीच्या अध्यक्षा डॉ. सपना महाजन, स्वरूपा मेटगुड, इनर व्हील क्लब ऑफ बेळगावच्या शालिनी चौगुले, सचिव पुष्पांजली मुकन्नवार, सहाय्यक व्यवस्थापक आनंद चिकली, पीआरओ राहुल देसाई तसेच सहाय्यक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.