प्रतिनिधी / बेळगाव : कै.डॉ. कमल कोडकनी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, त्यांच्या जयंती निमित्त आज दि. १८ रोजी, डॉ. कोडकनी सुपर स्पेशालिटी नेत्र केंद्र, बेळगाव येथे १५ रुग्णांवर अत्याधुनिक उपकरणे आणि लेन्ससह मोफत मोतीबिंदू फाको शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डॉ.आनंद पुराणिकमठ, डॉ.संजय पाच्छापुरे आणि कोडकनी नेत्र केंद्राच्या सर्व टीमने मिळून यशस्वीपणे शस्त्रक्रिया केल्या. पुढील २ आठवड्यात आणखी शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील असे यावेळी सांगण्यात आले.
मोफत शस्त्रक्रिया नेत्र शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे अनिश मेत्राणी – स्नेहम इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून द रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष श्री. बसवराज विभूती, डॉ. मनीषा हेरेकर, राजेंद्र बेळगावकर – डॉ. कोडकनी चॅरिटेबल फाउंडेशनचे विश्वस्त उपस्थित होते.
मेत्राणी यांनी डॉ. कोडकनी यांच्या नेत्र केंद्राच्या टीमचे बाल नेत्ररोग, कॉर्नियल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, विट्रो रेटिना शस्त्रक्रिया, स्पेक्टेकल नंबर्सपासून मुक्त होण्यासाठी रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी, ड्राय आय मॅनेजमेंट सुविधा आणि इतर अनेक सुविधांसह सुपर स्पेशालिटी नेत्र रुग्णालयाबद्दल अभिनंदन केले.
डॉ. शिल्पा कोडकणी आणि त्यांची टीम गेल्या २२ वर्षांपासून दर १८ डिसेंबरला गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करत आहेत. त्यांनी आतापर्यंत 500 हून अधिक मोफत शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. अधिक लोकांपर्यंत पोहचून सेवाभावीवृत्ती उराशी बाळगून, डॉ. शिल्पा कोडकनी यांनी “डॉ. कोडकनी फाउंडेशन”. यासारखे अनेक सेवाभावी उपक्रम सुरू केले आहेत.
सर्व रूग्णांच्या वतीने अरुण काळभैरव यांनी डॉ. शिल्पा कोडकनी यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.