कै. डॉ. कमल कोडकिणी यांच्या जन्मतिथीनिमित्त आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
कै. डॉ. कमल कोडकिणी यांच्या जन्मतिथीनिमित्त रविवारी 15 रुग्णांवर मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. अत्याधुनिक उपकरणे व तांत्रिकदृष्ट्या प्रगत लेन्सच्या माध्यमातून डॉ. कोडकिणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. आनंद पुराणिकमठ, डॉ. संजय पाच्छापुरे आणि कोडकिणी आय सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रिया यशस्वी केली. पुढील दोन आठवड्यांमध्ये मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
या शिबिराचे उद्घाटन स्नेहम इंटरनॅशनलचे अनिश नेत्राणी यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष बसवराज विभूती, डॉ. मनीषा हेरेकर व कोडकिणी चॅरिटेबल फौंडेशनचे डॉ. राजेंद्र बेळगावकर उपस्थित होते. नेत्राणी यांनी या शस्त्रक्रियेबद्दल कोडकिणी आय सेंटरचे कौतुक केले. या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सेवा असल्यामुळे ऊग्णांची सोय होत असल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णांच्यावतीने अऊण काळभैरव यांनी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. शिल्पा कोडकिणी आणि त्यांच्या टीमकडून 22 वर्षांपासून 18 डिसेंबरला मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत 500 हून अधिक यशस्वी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सामाजिक कार्याच्या उद्देशाने डॉ. शिल्पा कोडकिणी यांनी डॉ. कोडकिणी फौंडेशन नावाने ट्रस्ट सुरू केले असून, त्याद्वारे अनेक उपक्रम राबविले जात आहेत.