प्रतिनिधी /बेळगाव
लोककल्प फौंडेशनने दत्तक घेतलेल्या पारवाड गावात नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. लोककल्प फौंडेशन ही लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत सेवाभावी संस्था असून कणकुंबी जंगलातील दुर्गम खेडय़ात नियमितरित्या आपले सामाजिक उपक्रम राबवित असते. पारवाड गावात एकूण 600 लोकसंख्या आहे.
संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीने 32 खेडी दत्तक घेतली आहेत. विविध संस्थांच्या सहकार्याने लोकमान्य सोसायटी व लोककल्प फौंडेशन सामाजिक बांधिलकी जपत आहे. नंदादीप नेत्र चिकित्सालयाच्या संयुक्त विद्यमाने नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. ग्रामस्थांची मोतीबिंदू, नेत्रदृष्टी क्रमांक व डोळय़ांच्या इतर समस्यांची तपासणी करण्यात आली. शेकडो ग्रामस्थांनी उपस्थित राहून नेत्रशिबिराचा लाभ घेतला. पुढील काही दिवसांत नेत्रदोष असलेल्या ग्रामस्थांना मोफत चष्मे वाटप केले जातील. यावेळी नंदादीप नेत्र चिकित्सालयाचे आनंद तुप्पड, पद्मा, जय बिक्रम साह, शारिक नाईक, सागर गोब्बर व लोककल्प स्वयंसेवक संतोष कदम, निखिल अर्जुनवाडकर, अनंत गावडे, सुहासिनी पेडणेकर आणि प्रितेश पोटेकर उपस्थित होते.