Tarun Bharat

गरिबांना डिसेंबरपर्यंत मोफत धान्य

Advertisements

आणखी तीन महिने मुदतवाढ ः 81 कोटी लोकांना मिळणार गरीब कल्याण योजनेचा लाभ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद सरकारने देशातील गरिबांना मोठी भेट देत मोफत धान्य योजनेचा कालावधी आणखी तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना यावषी डिसेंबरपर्यंत वाढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला 3 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. आता या योजनेचा लाभ डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वी ही योजना सप्टेंबर 2022 रोजी संपत होती. केंद्राच्या या निर्णयामुळे देशातील 81 कोटींहून अधिक जनतेला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. आता देशातील गरजूंना डिसेंबर 2022 पर्यंत मोफत रेशन मिळत राहील.

कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन असताना मार्च 2020 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही योजना एप्रिल ते जून 2020 पर्यंत होती. त्यानंतर नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यापासून आतापर्यंत ही मुदतवाढ कायम ठेवण्यात आली आहे. या योजनेनुसार ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा’ अंतर्गत ओळखल्या गेलेल्या लोकांना सरकार मोफत रेशन देते. या योजनेंतर्गत मिळणारे मोफत रेशन हे कार्डधारकांना रेशन दुकानातून मिळणाऱया अनुदानित धान्यापेक्षा जास्त आहे.

सरकारवरील आर्थिक भार वाढणार

अन्न मंत्रालयाने मोफत अन्नधान्य योजनेसाठी तीन महिन्यांचा कालावधी प्रस्तावित केला होता, त्यावर चर्चा झाली आणि योजनेचा कालावधी डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत देशातील सुमारे 80 कोटी लोकांना तांदूळ किंवा गहू दिला जातो. मात्र, या योजनेमुळे सरकारवर वर्षाला 18 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 1.44 लाख कोटी रुपये) बोजा आहे. योजनेची व्याप्ती वाढवल्यानंतर त्याचा सरकारवरील एकूण भार 44 अब्ज डॉलर्स (3.5 लाख कोटी रुपये) इतका होणार आहे.

उत्सवकाळात गरिबांना लाभदायी

मोदी सरकारने दसरा-दिवाळी या सणासुदीच्या काळात मोफत अन्नधान्याची व्याप्ती वाढवली आहे. सणासुदीच्या काळात ही योजना रद्द केल्याने लोकांना मोठा फटका बसेल, असे अनेक प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी आले होते. सणासुदीच्या काळात लोकांच्या आनंदोत्सवात हिरमोड होऊ नये म्हणून सरकारने प्रस्तावाला  मुदतवाढ दिली. यासोबतच येत्या काही महिन्यांत गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. विशेष म्हणजे, यावषी कमी पावसामुळे भात उत्पादनात 7 टक्क्मयांनी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाच सरकारने मोठे धाडस दाखवत मोफत धान्य दिल्यामुळे गरिबांना दिलासा मिळणार आहे.

Related Stories

जमालपूर खडियामध्ये काँग्रेसला एआयएमआयएमचे आव्हान

Patil_p

स्वत:च्या चुकीचा इव्हेंट कसा करायचा हे केंद्राकडून शिकावं – संजय राऊत

Archana Banage

देशात 86,498 नवे बाधित, 2123 मृत्यू

datta jadhav

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावर बंदी घालण्याची गरज नव्हती : मनमोहन सिंग

prashant_c

जम्मू-काश्मीरसंबंधी उच्चस्तरीय बैठक

Patil_p

दिल्ली-एनसीआरमध्ये वादळासह पर्जन्यवृष्टी

Patil_p
error: Content is protected !!