Tarun Bharat

रोटरी क्लबच्या माध्यमातून मोफत चष्मे वाटप

Free glasses distribution through Rotary Club

रोटरी क्लब कायमच सेवाभावी वृत्तीने काम करत असून आज ३७० लाभार्थी नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहेत अशी माहिती रोटरीच्या अध्यक्षा रो. विनया बाड यांनी दिली. पुढील काळात मुलांच्या व्यक्तीमत्व विकास उपक्रम आणि अपंगांना जयपूर फूट वाटप करण्याचा विचार आहे असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास उपक्रम हाती घेतला जाणार आहे असे रो विनया बाड यांनी सांगितले तर जयपूर फूट वाटप करण्याचा मनोदय रो राजेश घाटवळ यांनी व्यक्त केला.यावेळी रो राजेश घाटवळ,रो साईप्रसाद हवालदार, अँड जायबा धुरी यांनी सहकार्य केल्याचे स्पष्ट करण्यात आले.रोटरी क्लब, व्हिजन लॅब, सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, मुस्लिम वेल्फेअर संघटना यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि चष्मा वाटप कार्यक्रम करण्यात आला होता.

रो. विनया बाड म्हणाल्या,रोटरी क्लब सावंतवाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या डोळे तपासणी शिबिरा अंतर्गत व्हिजन लॅब तर्फे चष्मे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सुमारे ३७० लाभार्थीना चष्मा वाटप करण्यात आले.यावेळी या कार्यक्रमासाठी अनेक सेवाभावी संस्थेनी आपले योगदान देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपार मेहनत घेतली त्या सर्वांचे स्वागत आणि आभार मानण्यात आले.

सावंतवाडी/ (प्रतिनिधी)

Related Stories

धोकादायक विहिरींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

NIKHIL_N

तब्बल 47 तासांनी कोकण रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला

Patil_p

मुटाटला डोंगर खचला, जमीन दुभंगली

NIKHIL_N

दुचाकी दरीत कोसळून तरुण ठार

Patil_p

चिपळूणच्या शिरपेचात दोन मानाचे तुरे!

Patil_p

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छ्ता अभियानात परुळेबाजार ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम

Anuja Kudatarkar