प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी संचालित लोककल्प फौंडेशनतर्फे चापोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. चापोली गाव खानापूरच्या घनदाट जंगलात वसले असून जांबोटीपासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर आहे. लोककल्प फौंडेशनने दत्तक घेतलेल्या 32 गावांपैकी चापोली हे एक आहे. या गावांचे आरोग्य सुधारण्यासाठी लोककल्प फौंडेशन वर्षभर आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून काम करत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोककल्प फाउंडेशन केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटलशी संलग्न आहे.
या शिबिरात जवळपास 100 लोक उपस्थित होते. केएलई शताब्दी धर्मादाय ऊग्णालयाच्या डॉक्टरांनी ऊग्णांचे निदान केले आणि लोककल्प फाऊंडेशनने आवश्यक औषधे उपलब्ध करून दिली. कार्यक्रमासाठी लोककल्प फाऊंडेशनतर्फे मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
केएलई शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल टीममध्ये डॉ. ऐश्वर्या चव्हाण, डॉ. वैष्णवी मंदास, डॉ. भावना सुनकड, डॉ. कावेरी पाटील, नर्सिंग स्टाफ आणि पीआरओ संतोष यांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी लोककल्पचे स्वयंसेवक संतोष कदम, सूरजसिंग राजपूत, प्रितेश पोतेकर, अनंत गावडे आणि सुहासिनी पेडणेकर उपस्थित होते.