बेळगाव : लोकमान्यची कॅम्प येथील शाखा व माधवबाग हरी मंदिर क्लिनिक यांच्या साहाय्याने रक्तदाब आणि मधुमेह तपासणीचे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले होते. माधवबाग क्लिनिकच्यावतीने डॉ. संगीता खंजे यांनी लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण केले आणि योग्य सूचनाही दिल्या. प्रारंभी लोकमान्यच्या कॅम्प शाखेचे व्यवस्थापक रोहन मेहंदळे यांनी डॉ. संगीता खंजे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व माधवबागच्या अन्य सदस्यांचा सत्कार कॅम्प शाखेच्या कर्मचाऱयांकडून करण्यात आला. या शिबिरावेळी बेळगाव रीजनचे मार्केटिंग मॅनेजर गुरुप्रसाद तंगणकर व कॅम्प शाखेचे असिस्टंट मॅनेजर अर्जुन पाटील, अंकिता चौगुले, दिपाली भातकांडे, विनायक पाटील व कर्मचारीवर्ग उपस्थित होता. या शिबिरामध्ये कॅम्प परिसरातील रहिवाशांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात होता.
Previous Articleदहाव्या स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांना अभिवादन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.